व्हाट्सअप्प / सोशलमीडिया
व्हाट्सअप्प / सोशलमीडिया
" फेका आणि फेकुंचा "
प्रचंड आलाय ऊत ;
" सोशल मीडिया " म्हणजे
बंद बाटलीतील भूत .
आजकाल सर्वत्र दिसतेय
" whatsapp " चे फ्याड ;
सर्व नातीगोती विसरून
फेसबुक- ट्विटरने म्याड .
घरोघरी- चुलीपर्यंत जे-ते
केवळ ऑनलाईन दिसतात ;
बालकांपासून- म्हाताऱ्यापर्यंत
सर्वच whatsapp ला भुलतात.
पती-पत्नी दोघांचे असते
Whatsapp- facebook ला खाते ;
विरहाचे प्रेमगीत बेडरूम
बिचारे आकांताने गाते .
सरकारी कामकाजातही सर्वत्र
" व्हाट्सअप्प " चीच सत्ता ;
" मुक्काम पोस्ट व्हाट्सअप्प "
सरकारी अधिकारी- कर्मचाऱ्यांचा पत्ता.
रोज पोस्टमागून पोस्ट करून
सहनशक्तीच्या मर्यादा पाहतात ;
कधी कधी तर मृत्यूआधी
" भावपूर्ण श्रद्धांजली " वाहतात.
चॅटिंग- कॉलिंग - शेअरिंग
हीच " whatsapp " ची ख्याती ;
" विधायक की विघातक " घ्यावे
असते आपल्या हाती.
