वेश
वेश
झोळी भरली आहे
थाळी सरकली आहे
शिदोरी आजची आज
सहदोरी लांबचा राज
आस मायेच्या भिक्षेची
कास दिव्यतेज रक्षेची
नयन मिटवित हास्य
मनन फुलवीत प्रयास
पादुका फुलून गेल्या
संदुका गोठून थांबल्या
क्लेश चिंता नाही
वेश ओलांडत राही
