वेळेचे महत्त्व
वेळेचे महत्त्व
वेळ कोणाला थांबत नाहीं
स्वतः मात्र ती चालतच असते
तिची गती मात्र थांबत नाहीं
ती लोकांना गती शिकवते
तिला नाहीं कांहीं रंगरूप
आकार नाही विकार नाहीं
तिला महत्त्व आहे खूप
गेलेली वेळ मिळत नाहीं
नजरेला आमच्या ती नाहीं पडत
पण सदैव असते बरोबर
कदर नाही ते राहतात रडत
तिची तीव्र गती असते खरोखर
वेळेचा उपयोग करून घेण्यासाठी
बनवतात लोक समयतालिका
वेळेच्या संगे कामाच्या गांठी
एकत्र बांधायला विसरूं नका
