वेळ थोडी सरताना
वेळ थोडी सरताना


थोडीशी भीती वाटली, तुझा विचार करताना
आयुष्याच्या या वळणावर, वेळ थोडी सरताना
मीराही थकली, कृष्णाला सर्व काही सांगताना
नियतीही पाहत होती, सगळं पांगताना
आयुष्याच्या या वळणावर, वेळ थोडी सरताना
मान अपमान काही नको, या घटकेला जगताना
निरंतर रूप तुझे, याची डोळी पाहताना
आयुष्याच्या या वळणावर, वेळ थोडी सरताना
हरण केली सगळी द्रौपदी वस्त्रे, जिथे जमले सगळे शूर असताना
अहंकार नाचला जिथे, नाती सगळी आपलीच झुकताना
आयुष्याच्या या वळणावर, वेळ थोडी सरताना
नित्य भोग कोणा ना चुकले, सगळे आयुष्य पाहताना
काळजीला अभिमान वाटेल, असे काही मी बघताना
आयुष्याच्या या वळणावर, वेळ थोडी सरताना