STORYMIRROR

Pratibha Vibhute

Inspirational

3  

Pratibha Vibhute

Inspirational

वेदनांना अंत नाही

वेदनांना अंत नाही

1 min
243

हृदयाच्या कोंदणात

वेदनांना अंत नाही

साहू किती सांग देवा

वैरी फक्त मजा पाही...१


साध्या स्वभावाचा घेई

हेच लोक हो फायदा

आम्ही हितचिंतक हो

करी खोटाच वायदा...२


सदा ठेवला विश्वास

पाठीमागे करी वार

राक्षसाची वृत्ती अशी

जीवनाची त्यांच्या हार...३


आयुष्यात केले कष्ट

नाही कोणाला महत्व

सत्य मार्ग स्विकारून

माणुसकी धरी तत्व...४


दिला दु:खाचा डोंगर

स्वामी कृपा केला पार

कर्म चांगले करूनी

आला जीवना बहार...५


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational