वेदना ...!
वेदना ...!
भूतकाळातील वेदनांना
शिलकी खात्यात
पोता बाकी म्हणून जमा करीत
भविष्यातील उद्यासाठी
आज नव्याने
जीवाचा गाडा ओढायचा...
हेच काय ते आयुष्य असतं ....?
अन्
कुठवर जपायचे हे
मनातील असह्य मळभ
अजुनही प्रतीक्षेत मी
कधीतरी येईल
साऱ्या वेदनांचा सागर
घटाघटा प्राशन करणारा
अतीव तहानलेला अगस्ती
या भ्रामक कल्पनेत मी!!!
