STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

4  

Prashant Shinde

Inspirational

वेध...!

वेध...!

1 min
382

वेध....!


काय करावे काही कळेना

माझ्या भाग्याचे वाजले बारा

जीवनाची खुंटली गती जरा जरा

चालेना आता माझी मती तरा तरा...


जड झाले ओझे डोक्यावरती

जीव होतो वरती खालती

माफ करेल का ही धरती

आता होते मज खरी उपरती...


खा खा खाल्ले

नको नको ते आजवरी

नजरेत आले आता

चर्चा रंगते पहा कशी ओसरीवरी...


घरचे वासेही फिरले

मनातले मनसुबे सारे विरले

दिवस सुखाचे सरले

भोग कर्माचे आता उरले...


पेरले तेच उगवते

हा नियम असे निसर्गाचा

पैका कामी येतो घामाचा

फुका भरवसा काय हा कामाचा...


भाकीत माझे मलाच ठावे

तडफड झाली तरी काय करावे

वाटते माफी मागून पाय धरावे

आणि पुन्हा मुक्तपणे मेवा खावे...


पण रखवालदार आता गल्लोगल्ली

लांब झाली खरोखर मला दिल्ली

म्हणू लागले हा एक वल्ली

पहात नाही कोणी मज हल्ली...


लाज वाटली पाहिजे म्हणतात सारे

जणू हृदयावरी फिरतात निखारे

हालचालीसही लागला चाप रे

दिसतो प्रत्येक नजरेत मज बाप रे...


नैतिकतेची उडवून खिल्ली

पाहिली होती मीच दिल्ली

हरवली ती माझी हुकमी किल्ली

वाटते बाबा आता बरी माझी गल्ली...


कोणीतरी म्हणेल आता

वाजलेकी पुरते बारा

तीन तेरा अन नऊ अठरा

दिसतो मज अजूनही खतरा...


तडफड फडफड उगाच होते

स्वप्न दिवसाही अजून पडते

घोडे माझे ऐन वेळी पेंड खाऊनी अडते

यश दिल्लीचे पुन्हा हुलकावणी देते....


नजरेत माझ्या बेरकी पणा

पुरता निकामी झाला आता कणा

मतदार राजा घरोघरी काढतो फणा

भासतो त्यांना मी आहो खरा उणा....!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational