STORYMIRROR

डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Inspirational

3  

डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Inspirational

वेध स्वप्नांचा

वेध स्वप्नांचा

1 min
187

विहरती उंच गगनात

गगनात विहरती पक्षी

पक्षी उडती उंच आकाशी

आकाशी साकारली नक्षी


भरु दे बळ त्या पंखात

पंखात भरू दे वारे

वारे नेती तया क्षितिजी

क्षितिजी स्वप्न खुणावे न्यारे


ती गगन भरारी त्यांची

त्यांची उंच ती झेप

झेप स्वप्नांची बघा तयांच्या

तयांच्या स्वारीची धडक


विस्तारले आभाळ स्वप्नांचे

स्वप्नांचे रंग ते न्यारे

न्यारे सारे साकारताना

साकारताना होते वाहवा रे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational