वेड्यासारखं रडतं काय?
वेड्यासारखं रडतं काय?
“Plan थरला लोणावळ्याचा
Call आला येतेस काय?
एकविरेला जाऊ म्हणतात
सुट्टी जरा घेतेस काय ?
घेतली सुट्टी, गेलो वरती
हातान होता नारळ हार,
दुरून पाहिला देऊन तुझा
अश्रूंना तिथेच सुटली वाट
पाहत होते सगळेच आता
मनात असते झालाय काय?
देवलात येऊन असं कोणी,
वेड्यासारखं रडतं काय?”
“डोळ्यामध्ये पाणी माझ्या सहज
कधी येतच नाय!
Strong किती असली
तरी जवळ कोणी घेतच नाय!
जगासमोर दुःख सारे
पाण्याविना गिळून खाते,
तू समोर असल्यावर
अश्रू कसे लपून राहते!
माहित आहे तुला
माझ्या मनात किती साठलं हाय?
उगाच कोणी देवळात येऊन
वेड्यासारखं रडत नाय!!”
