एक मीरासुद्धा होती रंगली
एक मीरासुद्धा होती रंगली
“गर्व करे राधेचा ती प्रियसी
पत्नी तोरा मिरवत रुक्मिणी
थट्टा उडवीत म्हणे श्रीहरी!
माझ्या नामात एक मीरासुद्धा होती रंगली.”
“राधे तुला गर्व कसला?
मणी तुझा कसला तोरा?
माझे नाम मुखी घेता वेडी होते ती मीरा.”
“तिचं प्रेम म्हणावं की आराधना,
हरिनाम घेता म्हणे रचल्या काव्यरचना
उगा नाही अमृताचे गुण आले विषाला,
अशा एका वेडीला भाळला तो श्रीहरी
रंगामध्ये त्याच्या एक मीरासुद्धा होती रंगली.”

