चक्रव्यूही
चक्रव्यूही
उधानले हे अगचोर अर्णव
सह्याद्रीच्या गोफात जाणवते
ती सागरी स्पंदना
अनिलाचा कोप झाला का ?
ना आराम तिला क्षणभर
******
मुसलवृष्टीच्या मासात
कसा हा प्रखर प्रकाश !
सरी गेल्या तरी थेंबांचा ठसा
पडणाऱ्या उन्हाचं सोनेरी साज हा कसा !
वाऱ्यासंगे तरु ही करी किलबिल
अनिलाचा कोप झाला का ?
ना आराम तिला क्षणभर
