STORYMIRROR

Candy Heart

Romance Tragedy Fantasy

4  

Candy Heart

Romance Tragedy Fantasy

आठवते का तुला ती कथा

आठवते का तुला ती कथा

1 min
17

मंद असा वारा अलगद उडणारे केस 

तुझी एक टक नजर

ती मला पडणारी भुरळ 

आठवते का तुला ती कथा

आणि त्या कथेतील तू आणि मी 


तिथे कुठे दूर क्षितिजावर तुझ्यात विसावलेले मन 

आठवतो मला पापण्यांखाली दडलेला प्रत्येक असा क्षण 

मी फुलासारखी सौम्य होती 

तू ही स्तब्ध होतास जणू एक रात्र 

त्या छटा होत्या वेगळ्या अशा विश्वाच्या 

जिथे सागर आणि किनारा ही होता अथांग 

आठवते का तुला ती कथा 

आणि त्या कथेतील तू आणि मी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance