वेडी आशा
वेडी आशा
सारेच ऋतू चिडिचूप झालेत
मरणयातनांचा पाऊस
रपारप कोसळतोय
आभाळ वणवा
क्षितीजाच्या अलिकडे न्
पलिकडेही भडकलाय
विजेचा झंझावात सुरूच आहे
बेधुंद सरी बरसतायत
आणि तू मात्र ......
मरणयातना सहन करत करत
चिडिचूप झालेल्या ऋतूंचा
एक एक पदर बाजूला सारत
वसंतातला वैशाख वणवा आणि
मरण यातनांचा पाऊस अनुभवत
पुन्हा कधीतरी माझा आपला स्वतःचा
वसंत येईल या वेड्या आशेने
तिथंच उभी आहेस अजूनही
