वेडावल्या मना
वेडावल्या मना
वेडावल्या मना माझ्या
नको होऊ निराश
होतील हळू हळू ढिले
काळोखाचे पाश
ठेव श्रद्धा थोडी
आशा अंतरीची
काट्यांची आजची वाटही
होईल उद्या फुलांची
गडद अंधारी वाट ही
पण नको तु भिऊ
आले संकट कितीही
नको मागे पाहू
करू नको कंटाळा
ठेव हसरे मुख
सोसण्यामधुन ही मिळवं
अलौकिक सुख
नको असा खचू
चल धैर्याने ताठ
सुख दुःखाच्या पल्ल्याड
ती परिसीमा गाठ