STORYMIRROR

Meena Mahindrakar

Abstract

3  

Meena Mahindrakar

Abstract

लाखात एक- माझी बहीण

लाखात एक- माझी बहीण

1 min
166

लाखात एक आहे 

माझी बहीण छान,

भाऊ म्हणून तिचा 

मला मिळतो मान.


तिच्या अस्तित्वाने माझ्या

घरादाराला येई शोभा, 

खळखळणाऱ्या हास्याने तिच्या

अंगणी सौख्याचा परिमळ उभा


ठेवते धाकात सर्वांना 

प्रेमाची पाखरणही घालते,

चुका पोटात घेता घेता 

हळूचं कानही पकडते.


 ठेच लागता तिला

 धस्स होते उरात, 

सासरला जाता बहीण 

कसा राहू मी घरात?


बहीण आली धावत 

रक्षाबंधन सणाला,

नवचैतन्य बहरले

माझ्या घर अंगणाला


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract