STORYMIRROR

Meena Mahindrakar

Inspirational

3  

Meena Mahindrakar

Inspirational

तुझी कीर्ती

तुझी कीर्ती

1 min
10

तत्त्वज्ञानी राणी तू 

नाव तुझे अहिल्या,

तुझ्यासारखी तूच ठरली 

कित्येक सम्राज्ञी पाहिल्या.


प्रेमळ तू ,कठोर तू

तू श्रेष्ठ शासनकर्ती,

शिवाजी महाराजासम

तूच उत्तम राज्यकर्ती.


सुखी सारी प्रजा तुझी

योग्य तुझे न्यायदान,

संतांचा दर्जा मिळे तुझं 

जन करी गुणगान.


जुन्या तीर्थक्षेत्रांचा 

केला तू जिर्णोद्धार,

मंदिर ,धर्मशाळा ,घाट

बांधणारी तू दिव्यावतार.


सुक्ष्म अवलोकन तुझे

सामान्यांना दिला रोजगार,

शेतकरी होता आनंदी

नव्हता कराचा भार.


इतिहास लिहिला जेव्हा

शूर स्त्रियांच्या कथेचा,

अग्रणी ठरले नाव 'अहिल्या '

झेंडा फडके , तुझ्या कीर्तीचा.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational