श्रावण सोमवार कविता
श्रावण सोमवार कविता
एक होता व्यापारी
होत्या सुना चार,
तीन होत्या आवडत्या
एका नावडतीचा करायचा खार.
तिघींना होती दिली
घरातील कामे,
नावडतीला दिल्या गाई
ती जंगलातच रमे.
सोमवार व्रत करणाऱ्या
शिवकन्येसी झाली तिची भेट,
हे कोणते व्रत आहे
नाआवडतीने प्रश्न केला थेट.
आम्ही करतो शिवभक्ती
हे व्रत श्रावणात करतात,
ह्या व्रताच्या पुण्याइने
नावडती माणसे आवडती होतात.
आवडती लागली त्यांना
विनवणी करू ,
मला ही सांगा हे व्रत
मी सुद्धा करते सुरू.
नागकन्येने गंध ,फूल, अक्षता
बेलपत्र ही दिले,
सांग पूजा करून
उपवास करायला सांगितले.
नावडतीने भक्ती भावे
केली पूजा अर्चना,
शिव भक्ती केली मनापासून
व्रत केले पूर्ण श्रावण महिना.
प्रसन्न झाला भोळा शंभू
दुःख जीवनातील गेले सरून,
नावडतीची -आवडती झाली
सुख मिळाले भरभरून.
पाच उत्तराची कहाणी
झाली सफल संपूर्ण,
दिवस बदलतात सर्वांचे
स्वप्न प्रत्येकाचे होता पूर्ण.
करा महादेवाची भक्ती
आहे भक्तीचा भुकेला ,
चांगले कर्म करून
बना त्याचा चेला
