रक्षाबंधन
रक्षाबंधन
एक अनोखं नात असे
बहीण आणि भावाचं
निर्मळ प्रेमाचा झरा
सौंदर्य खुले घराचं
रुसवे-फुगवे, गमतीजमती
बघत असते माऊली
मनी होऊनी प्रसन्न म्हणे
व्हा एकमेकांची सावली
संकट समयी दोघे
येता मदतीला धावून,
घेतलय त्यांनी एकमेकांना
दुसऱ्याणसाठी वाहून
रक्षाबंधनाच्या सणाची
लागते ओढ बहिणीला,
भावासाठी तिची पाऊले
वळत असती माहेराला
राखीच्या धाग्यात असे
निखळ प्रेमाचे बंध,
बहिण भावाच्या प्रेमाची
तेवते ज्योत मंद
