गवळण
गवळण
गोपिकांच्या खोड्या करी
असा कसा खट्याळ रे तू कान्हा
तरी यशोधेला फुटे बघ पान्हा॥ ध्रु ॥
दही दूध घेऊन या गवळणी निघाल्या बाजारी
नटखट कान्हा वाट आडवीता राधा होई लाजरी
मोहनी कशी घालशी तू रे कान्हा,
तरी यशोदेला फुटे बघ पान्हा ॥१॥
आडवी गोपिकांची वाट, त्यांचा फोडीतो माठ,
लपूनछपून देतो त्रास, रस्त्यात पडता तुझी गाठ.
असा कसा मायावी आहे रे तू कान्हा
यशोदेला फुटे बघ पान्हा ॥२॥
बासरीचा स्वर तुझा धुंद करी रे मना,
भूलली राधा बघ पाहून तुझ्या खाणा-खुणा.
चीतचोर असे तू भलताच रे कान्हा
यशोदेला फुटे बघ पान्हा ॥३॥
