झुला
झुला
आठवणींचा झुला
झुलतसे दारी
दूर देशी असे
बहिण हसरी
आई बाबा गेले
पोरके करून
एकमेका साथ
त्यांनाच स्मरून
बहिण नी भाऊ
जोडी असे छान
रुसवे फुगवे
नसे मानपान
बहिण भावाची
प्रीत असे न्यारी
लाडकी बहीण
असे त्याची परी
सुंदर हे जग
जगातील नाती
एकमेका साथ
आनंदाने गाती
न बोलता कळे
मनातील इच्छा
सुख मिळो देवा
हीच रे शुभेच्छा
