STORYMIRROR

Meena Mahindrakar

Abstract

3  

Meena Mahindrakar

Abstract

रक्षाबंधन एक अनोखं नात असे

रक्षाबंधन एक अनोखं नात असे

1 min
190

रक्षाबंधन

एक अनोखं नात असे

बहीण आणि भावाचं

निर्मळ प्रेमाचा झरा

सौंदर्य खुले घराचं

रुसवे-फुगवे, गमतीजमती

बघत असते माऊली

मनी होऊनी प्रसन्न म्हणे

व्हा एकमेकांची सावली

संकट समयी दोघे

येता मदतीला धावून,

घेतलय त्यांनी एकमेकांना

दुसऱ्याणसाठी वाहून.

रक्षाबंधनाच्या सणाची

लागते ओढ बहिणीला,

भावासाठी तिची पाऊले

वळत असती माहेराला.

राखीच्या धाग्यात असे

निखळ प्रेमाचे बंध,

बहिण भावाच्या प्रेमाची

तेवते ज्योत मंद. 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract