रंग आणि जीवन
रंग आणि जीवन
रंगाने रंग भरले
रंगमय झाले जीवन,
एक एक रंग वेगळी कहाणी
जगणे झाले पावन.
लाल रंग घेऊन आला
ऊर्जा आणि शक्ती,
यश आणले खेचून त्याने,
स्वास्थाशी झाली भक्ती.
पिवळा रंग सांगे
सौंदर्य आणि अध्यात्माची महिमा,
भक्तीचा प्रकाश पसरे
बृहस्पतीच्या कृपेची गरिमा.
गुलाबी रंगाने फुले
स्नेहा आणि कोमलता,
अबोल अशी प्रीत फुले
धुंद करी मुग्धता.
हिरवा रंग प्रतीक आहे
श्रीमंती आणि समृद्धीचे,
निसर्गाची किमया बघा
शिकवण देते वृद्धीचे.
निळा रंग दर्शवतो
शांती आणि अध्यात्मकता,
अफाट शक्ती पुढे
लीन होते समर्पकता.
बैगणी रंगाने व्यापले
चैन ऐश्वर्याचे जीवन,
भोगविलासतेने होईल
जीवन आपले पावन.
नारंगी रंगाने केले
जीवन उत्साहाने रेलचेल,
ऊर्जाचे स्तोत्र बनून
जीवन आनंदाचा खेळ.
सफेद रंग म्हणजे
सुरुवात आणि पवित्रता,
डाग पडता कुठेही
भंग होई शांतता.
भुरा रंग शिकवतो महत्त्व
प्रकृती आणि निर्भयतेचे,
जग मानवा दिला खुलास
कारण नसे येथे घाबरण्याचे.
काळा रंग हा
शक्तीला देई प्राधान्य,
रात्रीचा काळोख गडद
आशा निराशेला करी सुन्न.
असे हे रंग
असे हे जीवन,
त्याच्या असण्यानेच
संसारात रमते माझे मन.
