STORYMIRROR

परेश पवार 'शिव'

Inspirational

4  

परेश पवार 'शिव'

Inspirational

वचन

वचन

1 min
263

खोल अंतरी कितीतरी, मी खोल खोदले आहे..

माझ्या मलाच माझ्यामध्ये, किती शोधले आहे..


जपलेत जरी हे हिशेब मी, आजवरचे सारे..  

नाव परी चुपचाप तयातून, तुझे खोडले आहे..


पावसात आठवांच्या, कुडकुडलो भिजून तेव्हा..

मायेपोटी कवितेने मज, कुशीत ओढले आहे..


नकोच मजला आता, ते तुझ्या सयींचे लेणे..

संदर्भावरी तुझिया मी, पाणी सोडले आहे..


हातातून हात सुटावा, ऐसे सोपे इतके नाही..

कसे सोडवू नाव तुझ्या, नावास जोडले आहे..


स्वप्न सुखाचे पडणे, मज बंद कशाने झाले?

इंद्रधनुष्यी स्वप्नांचे का, यंत्रच मोडले आहे..?


शहरात फक्त 'शिवा'च्या, घरावर मेघ फुटावा..

पावसानेही का मैत्रीचे, वचन तोडले आहे??


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational