STORYMIRROR

sarika k Aiwale

Romance Tragedy

3  

sarika k Aiwale

Romance Tragedy

वचन

वचन

1 min
199

तुला दिलेल्या वचनाची 

तुला आठवण असेल ना 

अबोल माझ्या भावना 

कळल्या असतील ना 


रोज येतो चन्द्र या नभी 

रोजचीच ती रात्र एकाकी 

भयाचे चांदणं असे मनीं

वचनं शब्दांचा भार वाही 


वचनातं आठवशील मला

शब्दात साठवशील मला

चंद्र सांगेल रोज सांजेला 

दिलं जे वचन पौर्णिमेला 


असेन नसेन मी या जगी 

माझी सावलीही साथीला 

नकोच होती सोबत तुला 

मग प्रश्न मना का विचारला 


दिलं वचन त्या सांजवेळी

नसेन अडथळा मी जीवनी

मरणासही हेवा हा वाटावा 

जगू तरी कोणासाठी जगी 


जगात तुझ्या नसेनच मी

वचनातं नको आठवणी 

दिलं वचन जे पौर्णिमेला 

जगणं वाहिलं त्या शब्दांला 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance