STORYMIRROR

Jyoti gosavi

Tragedy

3  

Jyoti gosavi

Tragedy

वैशाख वणवा

वैशाख वणवा

1 min
136

वैशाख वणवा कसा 

पेटला उरात 

धनी माझा परदेशी

 नाही तुकडा घरात


 माझी कच्चीबच्ची

 गेली पोटं खोलखोल

 पोटात पेटली आग 

 डोळ मात्र ओलं ओल


ओल्या डोळ्याच्या थेंबात

 आग पोटाची इझना 

 डोळा आसू बी सुकलं

 तुकडा भाकरीचा भिजना


 एका राती आला

 एक नवा मुसाफिर

 दिल दान देहाचं 

भरलं पोटाचं डबर


 परमेश्वरा तुझं 

पाप-पुण्य चुलीत घाल

 दे पोटाला भाकरी

 वाचव लेकरांचे हाल


 धनी गेलाय विसरून

 त्यास नाही लाजलज्जा

 उभ्या देहाने मांडीला

 माझा माझ्याशीच कज्जा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy