Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Dr.Riddhi Jadhav

Inspirational

4.6  

Dr.Riddhi Jadhav

Inspirational

वैद्यकला

वैद्यकला

1 min
161


नसे मी उत्तम चित्रकार, तरी काहींचे आयुष्य मी रंगवते सप्त रंगाने;

नसे माझ्याकडे कोकिळेचे माधुर्य, तरी सजे मैफिल माझ्या संगाने!


नसे माझ्याकडे शिवणकलेचे साैंदर्य, तरी फाटलेल्या अवयवावर टाके व्यवस्थित बसतात;

नसे सुगरणीसारखी स्वयंपाक कला, तरी भुकेलेल्याला स्वतःच्या वाटणीचे चार घास भरवल्यावर;

चार चेहरे हसतात!


नसे माझ्याकडे नटराजांची देणगी, तरी सगळ्यांची मने माझ्यासमवे डोलतात;

आणि नाही मी कोणी मोठी लेखक, तरी मनीच्या भावना कागदावरती बोलतात!!


या नाजूक देहाला सिद्ध करू शकेन अशी नाही कोणती उत्तम कला माझ्या गाठीशी;

पण माणुसकीचे कर्तव्य म्हणून तुझ्या मृत्यूच्या लढाईत उभी ठाकेन तुझ्या पाठीशी!!

उभी ठाकेन तुझ्या पाठीशी!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational