STORYMIRROR

DATTA VISHNU KHULE

Inspirational

3  

DATTA VISHNU KHULE

Inspirational

वायू हेचि पंचप्राण

वायू हेचि पंचप्राण

1 min
235

वायू हेचि पंचप्राण

वायुविना नाही मनुष्यप्राण

चोहीकडे वावरतो सजीव

ही वायुचीच किमया

वायूला जन्म देण्या झाडे आपण लावूया


दाही दिशा चिवचिव

वायू देतो सजीवांना जीव

पवनदेव अवतरे जेव्हा धरत्रीवरी

प्राणिमात्र सारे प्राणवायू आपुल्या शरीरात भरी


दिनरात आपण करी प्राणवायू श्वसन

पवनदेव गाजवितो जगावरी शासन

प्राणवायू हाच खरा अनमोल खजिना

अमृताचा वर्षाव धरत्री मातेचा दागिना


नसते जर प्राणवायू या भूमी वरी

ओसाड रान सारे जीव नसता धरणीवरी

सर्व सजीवांची पवनदेवा आहे बहुत काळजी

कर्तव्य ते आपुले नित्यनेम अन चोख बजावी


एकत्र येऊ आपण सर्व भूमिजन

वृक्ष लागवड करुनी करू संवर्धन

प्राणवायूचे करूया निर्माण


भीषण अशी परिस्थिती जगावरी आली

नसता पुरेशा प्राणवायू अनेक जन दगावली

महामारीच्या या काळात पडू लागलाय तुटवडा

प्राणवायू विना रुग्णांचा होतोय तडफडा


आजपासून आपण संकल्प करू या

प्रत्येकाने पर्यावरणाचे संवर्धन करू या

 झाडे लावू या झाडे जागवू या

होईल प्राणवायूचा भरपूर साठा

कधीच अपुरा नाही पडणार

होईल रुग्णजनांना पुरवठा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational