वाटलं होतं
वाटलं होतं
वाटलं होतं
उतरत्या वयात
आधार देईल
माहित नव्हते
आधार काढून घेईल
वाटलं होतं
जमापुंजी म्हातारपणी
कामी येईल
माहित नव्हते सर्वस्व
त्याच्या स्वाधीन होईल
वाटलं होतं
निवृत्तीनंतर निवांत राहू
माहित नव्हते मुळीच
पुन्हा नोकरी पाहू...
