परतीची वाट
परतीची वाट


परतीच्या वाटेवर सूर्य नेहमी हसतो
पुन्हा नवी पहाट घेऊन येईन मनी ठरवून जातो
शिकण्यासारखे आहे खूप काही
मावळतीचा सूर्य निरखून पहा कधीतरी
परतीची वाट म्हणजे शेवट नसतोच मुळी
पुन्हा नव्या उमेदीने सुरुवात करायची हेच भाळी
अनुभवांची झोळी असते सोबत
त्याच्या साथीने होईल ना नवी सुरुवात सुखकर
परतीच्या वाटेवर सर्वांना चालायचे असते
पण ती वाट आनंदी करणे आपल्याच हातात असते
नवी सुरुवात नव्या गोष्टीचा आरंभ
पुन्हा वाटसरू होऊन प्रवास करा प्रारंभ