STORYMIRROR

Sonali Parit

Romance Others

3  

Sonali Parit

Romance Others

कोणे एके काळी

कोणे एके काळी

1 min
322

भेटलो होतो जेव्हा 

अनोळखी होतो एकमेकांसाठी

लपाछपी नयनांची चालली होती

कोणे एके काळी...


कळले न मला हरवून गेले 

ओढ लागली जीवा आणि 

चुंबकासारखे खेचले गेले 

बोलायचे होते खूप काही

कोणे एके काळी...


मन झुरायचे तुला पाहण्यासाठी

समोर येताच लाली गुलाबी गालाची

रंगून जायचे मी लालच लाल

तो अनुभव होता अगदीच खास

कोणे एके काळी...


तू समीप येता

घालमेल होत असे जीवाची

विसरून स्वतःला तुझ्या डोळ्यात हरवायची

कोणे एके काळी...


प्रश्न उभे मनी 

खरंच तुझ्या हृदयात आहे का मी अजुनी?

म्हणायचा ना तू!

माझी राणी

कोणे एके काळी...


आठवण होते प्रत्येक क्षणाची

भेटलो होतो आपण 

कोणे एके काळी...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance