#सरळ शब्दात
#सरळ शब्दात


प्रामाणिकपणा आहे मनात माझ्या
धमक आहे शब्दात माझ्या
खोटे आरोप लागले जरी
परवा नाही कोणाची
मी आणि माझे मन आहे खरे
सरळ शब्दात सांगतो तुला
लोक काय बोलतील याचा
कधीच विचार केला नाही
ते कालही बोलत होते
आणि आजही बोलत आहेत
सरळ शब्दात सांगतो तुला
तू नक्की विश्वास ठेवशील,
समजून घेशील वाटले होते मला
उशिरा कळले मला चुकलोच जरा
सरळ शब्दात सांगतो तुला
जसे मी तुला माझे मानतो
तशी तूही मला तुझी मानते<
/p>
वाटलं होतं खरं
पण संशयाचे भूत मानगुटीवर बसलं
हे आता स्पष्ट बघितलं
ऐक सरळ शब्दात सांगतो तुला
तुही त्या लोकांच्या कळपात दिसली मला
बरं झालं कळलं मला
आता मात्र मनावर दगड ठेवतो
लवकरात लवकरात लवकर
समोरून निघून जा माझ्या
सरळ शब्दात सांगतो तुला
जा आता बघ दुसरा कोणीतरी
फक्त एकच लक्षात ठेव
संशय नको विश्वास ठेऊन राहा
शेवटपर्यंत तो नक्कीच साथ देईल तुला
सरळ शब्दात सांगतो तुला
#सरळशब्दात