नात्यांचे मोल
नात्यांचे मोल
पाहिले होते भलेमोठे स्वप्न
खडतर प्रवासाने अखेर सत्यात उतरले
मागे वळून पाहताना सारे अंधुक दिसत होते
पैशा मागे धावता धावता
सारे काही मागे पडले होते
म्हणूनच की काय भल्या मोठ्या घरात
मी एकटीच राहत होते
तेच घर आता
मला खायला उठतं होत
सारे काही भयान होऊन बसले
स्वप्नपूर्तीचा आनंद करावा की
एकटेपणाचे दुःख कहीच
कळेनासे झाले
पैशांची गरज आणि नात्यांचे मोल
आता मला कळून चुकले होते
म्हणूनच पुन्हा नाती जोडायचे ठरवले
कधी डोळ्यात पाणी तर ओठांवर हसू
घेऊन नाती आनंद आणि सोबत देतात
जीवन जगण्यासाठी पुरेसा आधार देतात
आयुष्याच्या मुळाशी नाती
घट्ट धरून ठेवायचे आहेत आता
आनंदाने जगायचं आहे आता
