चिऊ काऊ
चिऊ काऊ
1 min
351
चिऊताईची चिव चिव
कावळ्याची कावकाव
काऊ म्हणे चिऊला
आता भाव नको खाऊ
भांडण लागले जोराचे
पाहायला आले पोपटराव
मिठू मिठू करत म्हणाले
काय चालले तुमचे राव ?
तिकडून आली कोकिळा
कुहू कुहू गात सुरात...
काय झाले काय झाले
विचारते गोड गाणे गात...
<
Advertisement
strong>मी आधी सांगेन म्हणत
दोघेही ऐकेनात
अजूनच रंगात आले भांडण
चिव चिव... काव काव...
कोकिळा वर अजूनच
चिडले कावळेराव
दुखावली कोकिळा अन्
निघाली लगेच पुन्हा गाणे गात
चिऊ-काऊ काही ऐकेना
भांडण काही मिटेना
मिठू मिठू करत पोपट म्हणाला
फंदात पडलो उगाच राव