STORYMIRROR

Sonali Parit

Inspirational

3  

Sonali Parit

Inspirational

क्षण

क्षण

1 min
384

निसटून गेले क्षण...

तू झुरत बसू नको

अजूनही वेळ गेली नाही

निराश होऊ नको


सामर्थ्य आहे तुझ्यात या क्षणाला

अधिक खुलवण्याचे

बघ ना एकदा ते क्षण 

जे तुझ्या हाती असतील


किती आनंदी असू शकतील

चांगली संधी आहे... हो की नाही? 

क्षणांना सुंदर आठवणींमध्ये 

कैद करण्याची?


बस्... तयारी ठेव मनाची 

येणाऱ्या क्षणांना प्रफुल्लित करण्याची

नवे क्षण आनंदाने जगण्याची


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational