वाटचाल
वाटचाल
जीवनाची वाटचाल करताना
सुखदुःखाचीआसवे भरावी लागतात
कधी चालावं तर कधी धडपडाव
कधी न थांबावे जरी लोक बघतात
जन्म मृत्यू जरा व्याधी हेच आहे
प्रत्येकाच्या जीवनातील चार दुःख
घेतले जयाने समजून याचे मर्म
तयाने पाहिले प्रत्येक वेळी सुख
लहानपणी नसते समज बुध्दीत
काय करावे अन् काय न करावे
नसते देहात शक्ती काही करण्याची
तरीही स्वप्न या नयनी भरावे
येता यौवन खुलून हळूहळू
शक्ती अन् समज येत जाते
काय करावे अन् कशासाठी
ही समज समाज आपणा देते
कधी लागता सत्कारणी यौवन
देशाचे उज्वल भविष्य घडते
नाहीतर न मिळता शिकवण
तेच समजत खितपत पडते
जसजसे वाढू लागते आपले वय
कोणी वृध्द तर कोणी म्हातारा म्हणता
कोण सांगेल आता त्यांना
जीवनाचे सारे अनुभव हे जाणता
येता जीवनाचा वृद्धावस्थेचा काळ
अनुभवाने जीवन भरून जाते
पण करण्या काही नवं उम्मेदिने
या कायेत शक्ती कुठे राहते
