STORYMIRROR

Prashant Shinde

Action Classics

3  

Prashant Shinde

Action Classics

वाट...!

वाट...!

1 min
190

वाट पाहुनी थकलो देवा

धाव रे तू लवकरी

घायाळ जीवास माझ्या

पाव रे झडकरी

किती तंगविशी मजला

आता दमला प्राण माझा

खेळ होतसे तुझा पण

टांगणीस लागतो जीव माझा

साऱ्या जगाचा तू नियंता

तुला अश्यक्य काही नाही

मग उगाच का सांग मला

करुणा का तुझं येत नाही

चुकले असेल काही

नाही म्हणत, मी नाही

पण लेकरू तुझेच देवा

करू नकोय रे कावा

आता तुझाच आधार मजला

तू जाणतोस सर्व काही

तुझ्या कृपेंवीण आता

खरेच काही श्यक्य नाही

तुझ्या आशीर्वादाने देवा

आज येथवर आलो

आता हृदयाशी धरता मला

खरेच सर्व भरून मी पावलो....!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Action