वाट पाहते प्रियाची
वाट पाहते प्रियाची
ते अबोल शब्द
बोलका तुझा स्पर्श
आजही आठवतो मला
त्या आठवणींचा सुर्यास्त
नजरेत गंधाळलेले ते क्षण
भावनांनी ओथंबलेलं माझं मन
वाटे का निघूनी गेला
प्रेमाचा तो सन
सुगंधही कोमेजावा
रात्रीस प्राजक्ताविना
चंद्रही सुना-सुना
त्याच्या रोहीणी विना
गारव्याचा स्पर्शही आता
छळतो रे मला
आभासी चाहुल तुझी
देते विसावा मनाला
उजेडातही काळोख भासतो
आसवे डोळ्यांत दाटताना
अवजड होती पापण्या
वाट तुझी रे पाहताना
मुकी माझी हाक ऐकूनी
सख्या तु येरे परतुनी
असह्य होते आता
आठवणींची उजळणी
आठवणींची उजळणी!!!

