वाट पाहते धन्याची
वाट पाहते धन्याची
Prompt no 8
वाट पाहती धन्याची
दारुड्यास तर कारणच
हवे
पिऊन टुन्न होण्याचे
माणूस असो वा असो कार्टून
निमित्त हवे पिण्याचे
स्वतःच्याच धुंदीत पडला
पर्वा नाही कोणाची
आनंदाची लावून समाधी
करून परवड देहाची
दारुड्यास ती लाजच नसते
जनाची वा मनाची
घरी उपाशी पोरेबाळे
वाट पाहते धन्याची
सौ ज्योती गोसावी/दुसंगे
ठाणे