STORYMIRROR

Varsha Fatakale warade

Inspirational Others

4  

Varsha Fatakale warade

Inspirational Others

वात्सल्याचा झरा

वात्सल्याचा झरा

1 min
385

वात्सल्याचा झरा अंतरात वहातो

आईच्या मायेचे देवही गुणगान गातो

पिल्लासाठी झटत असते जी दिनराती

स्नेहधारेचा स्रोत जिच्यात अखंड वाहतो


स्वप्न उराशी बाळगून राबते अहोरात्र

मुलांचे कल्याण व्हावे हा एकच ध्यास

संस्कारांची शिदोरी मुलास ती देते

नाही होऊ देत नीतिमूल्यांचा ऱ्हास


आनंदी उत्साही नेहमीच राहते

घरादाराची बनते स्फूर्ती

मायेच्या पदरात लेकरास घेते

सहनशील ही वात्सल्य मूर्ती


संकटसमयी धावूनी जाते

घराचा तोल जाऊ देत नाही

मुलासाठी अश्रू ढाळते, सावरते 

दुःखासही कधी घाबरत नाही


नात्यांचा ओलावा जपते

प्रेमाच्या बंधनात बांधून ठेवते

बनुनी कस्तुरी गंध संसाराचा

जीवनाचा पंथ सुगंधी करते


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational