वास्तवातील स्वातंत्र्य
वास्तवातील स्वातंत्र्य
ब्रिटिशांशी लढा देवूनी
राष्ट्रीय स्वातंत्र्य मिळविले
स्वातंत्र्यासाठी सैनिकांनी
प्राणांचे बलिदान दिले.
व्यक्ती स्वातंत्र्य आहे हा
दुसरा अर्थ स्वातंत्र्याचा
यात आचार आणि विचार
अंतर्भूत दोन्ही प्रकारचा.
भ्रष्टाचार असो वा लाच
घेतात देतात खुशाल
हेच दुर्दैव या मातीचे
यावर तुम्ही काय बोलाल ?
छेडछाड किंवा बलात्कार
घृणास्पद कृत्य करतात
मुली स्त्रिया आहे का सुरक्षित
भारताच्या या स्वातंत्र्यात.
बालके होती बालकामगार
खेडोपाडी अथवा गरीबात
शिक्षणापासून वंचित लेकरं
पूर्णतः येईल साक्षरता भारतात ?
अहिल्याबाई, लक्ष्मीबाई यांच्या
पराक्रमाचे धडे सांगतात एकीकडे
लिहताना सुध्दा हात कापतो
स्त्री भ्रूणहत्या करतात दूसरीकडे.
माझ्या या भारत देशातील
कितीतरी समस्या मांडू अशा
वास्तवातील स्वातंत्र्यासाठी
मिळेल का हो नवीन दिशा ?
प्रयत्नांची पराकाष्ठा करूनी
वैचारिक मशाल हाती घेवू
आपल्या या भारत मातेला
खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य बनवू.
