वास्तव स्त्री मनाचे...
वास्तव स्त्री मनाचे...


स्त्री मनास अभाग्याचे किती धागे
कधी उलगडले तर कधी कुरतडले
चिरले कधी नकोशा स्मित आसवांनी
कधी शब्दाच्या कडव्या हर्ष धारांनी
विस्कटलेल्या खेळाला भय ठिगळे
हरण्याला कितीदा अग्नीत कुरवाळले
वास्तवाची भाषा आता जगण्याची
कुणा कळेल का वाताहत मरण्याची
हिणवण्यात हिरमोड असण्याचा
आधार स्वतःच्याच नाही नसण्याचा
मानापमान संस्कृतीच्या विळख्याचा
फास गुलामगिरीच्या साखळदंडाचा
अमानवी हालअपेष्टांच्या आकांताचा
प्रश्नांचा दोरखंड आज हा भविष्याचा
अंती आयुष्य उरते उद्याच्या संघर्षाचे
किती अडथळे स्वप्नास अस्तित्वाचे
आता मुक्ततेचा रंगेल का विचारी डाव
स्त्रीला स्वातंत्र्याची खरंच मिळेल का
वास्तविक हक्काची मनोमनी शान...