STORYMIRROR

Jaywant Chavan

Inspirational

4  

Jaywant Chavan

Inspirational

वारीचा वारकरी

वारीचा वारकरी

1 min
446

आषाढी कार्तिकी पंढरीची वारी

भजनात दंग झाले वारीचे वारकरी


डोई तुळस हाती भगवा झेंडा

गळा तुळशीमाळा भाळी चंदनाचा टिळा


टाळ मृदुंग चिपळ्या होतो नामाचा गजर

भक्ती रसात उधळती गुलाल अबीर


नाही उन पाऊस नाही थंडी वारा

हरी भजनात दंग होतो विसर साऱ्याचा


पंढरीची वारी पुण्य पडते पदरी

सदा घडो सेवा माऊलीची आस ही अंतरी


आलो गळा भेटी ठेवावी कृपा दृष्टी

वारीचा मी वारकरी आलो तुझ्या पंढरपुरी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational