STORYMIRROR

Jaywant Chavan

Others

3  

Jaywant Chavan

Others

माझी माय मराठी भाषा

माझी माय मराठी भाषा

1 min
187

काय सांगू महती

माझ्या माय मराठी भाषेची,

माय मराठी आमची

आहे खुप लाडाची...


कुसुमाग्रजांनी वसा आहे दिला

कोंकणी वऱ्हाडी ह्या भाषांनी जन्म घेतला,

संस्कृत भाषा असे हिची मायमाऊली

माझ्या मराठी भाषेत आहे गोडवी...


ज्ञान देई अगणित

अलंकारात ती सजूनी,

शब्दांचे करी मोत्यांचे मणी

अशी भाषा ही माझी मराठी...


मराठीत जन्मली माझ्या ज्ञानेश्वरांची ओवी

कुसुमाग्रज,पाडगावकरां सारखे कवी,

बाबासाहेबां सारखे प्रकाशमान रवी

अशी आहे माझ्या मराठीची थोरवी...


शान महाराष्ट्रीय मनाची

आहे आमची ती राजभाषा,

मराठी माणसांची ती अस्मिता

तिला मिळावा दर्जा अभिजात भाषेचा...



Rate this content
Log in