वाढदिवस
वाढदिवस
1 min
174
वाढदिवस म्हणजे काय असतं
म्हणतात आयुष्य एक वर्षाने कमी होतं,
आणि हो वय एक वर्षाने वाढतं
मात्र तरुण मन वार्धक्याकडे झुकतं...
असलं नवं वर्ष जरी
जानेवारी-चैत्राला,
आपल्या साठी मात्र सुरू होतं ते
आपल्या वाढदिवसाला...
गेलेल्या आयुष्याच्या लाटेची
पुन्हा वाट पाहायची नसते,
तर येणाऱ्या नव्या लाटेला
सुखाची किनार दाखवायची असते...
रडत रडत आलो जन्माला
आनंद होता माऊली च्या चेहऱ्याला,
मुलगा झाला म्हणून बाबा खुष होता
इथूनच सुरुवात झाली आयुष्य समजायला...
आयुष्यातले ३६४ दिवस
धावपळीत घालवले,
मग म्हटलं माझा उद्याचा दिवस
स्वतःसाठी जगायचं ठरवले...
