STORYMIRROR

Jaywant Chavan

Others

3  

Jaywant Chavan

Others

पाऊस आणि बाप्पा

पाऊस आणि बाप्पा

1 min
177

पावसाच्या रूपाने

गणराया तू दर्शन दिले

माझी साद ऐकून धावून आलात

आज डोळ्यांचे पारणे फिटले...


वाऱ्यासंग रोप हे डोलू लागले

हिरवेगार माझे शिवार फुलले

पाखरासंगे बोलू लागले

आज माझे शेत बहरले...


शेताच्या विहिरीला पाणी चढले

माझे राजा सर्जा आनंदाने नाचले

सुकलेली नदी माय खळाळून धावली

पहा देवा सारे जण तुमचे गाणे गाऊ लागले...


शेतातून माझ्या धान्य मिळणार

आता नाही कुणी हो उपाशी झोपणार

ही सारी तुमचीच कृपा देवा

तुमच्या मुळेच हे नवं जीवन मिळणार...


बा गणराया,

असाच पावसाच्या रूपानं

तू येत राहा, पडत राहा

डोळ्यांत प्राण आणून दरवर्षी

वाट तुमची पाहिल हा बळीराजा...


साहित्याला गुण द्या
लॉग इन