STORYMIRROR

Jaywant Chavan

Others

4  

Jaywant Chavan

Others

आयुष्याची डायरी

आयुष्याची डायरी

1 min
526

ते क्षण... त्या भावना....

आठवतोय त्या आठवणी..

उरली ती आता गळकी पाने...

विझले ते सर्व...ओल्या अश्रूंनी...


नावास एक डायरी पण पुस्तक आयुष्याचे!

सुख दुःखाने पानं भरली

काही पानं कोरीच राहून गेली...

काळासकट ती गळून गेली....


पाने उलटता उलटता

उमटतात कागदांवरती ठसे...

लिहीता लिहीता अश्रू ओथंबले...

लिहावसे वाटले.. पण....ते पान गळून गेले....


आयुष्याचे पुस्तक... 

एक साधी डायरी..

गळक्या पानांचे पुस्तक नाही

असे फक्त शिल्लक रद्दी....


असे एक गळके पान

आयुष्यातले....

आठवणींसकट गळून गेल....

ना पलटले पुन्हा मागच पान..

पुढे आयुष्य चालतच गेल...


Rate this content
Log in