STORYMIRROR

Jaywant Chavan

Others

4  

Jaywant Chavan

Others

ओढ पावसाची

ओढ पावसाची

1 min
308

ओढ पावसाची

वाऱ्या सोबत डुलणाऱ्या झुडुपाची

सरीच्या पावसात चिंब भिजण्याची...


ओढ पावसाची

हिरवे हिरवे रान सजण्याची

आतुरता फुलांना सर्वत्र सुगंध दरवळण्याची...


ओढ पावसाची

मनसोक्त मयूरा सोबत नाचण्याची

चातकाची आतुरता संपण्याची...


ओढ पावसाची

काळी माती अन पावसाच्या थेंबाच्या मधूर मिलनाची

हसत खेळत सर्वांना सुगंध देण्याची...


ओढ पावसाची 

बळीराजाच्या जीवनाला हातभार लावण्याची

शेतामध्ये हिरवं गार रान फुलवण्याची


ओढ पावसाची 

कवीच्या मनातील भावना कवितेत उतरविण्याची

 अन शब्दसरींतुन रसिकांनी चिंब न्हाण्याची...


Rate this content
Log in