वार्धक्य
वार्धक्य
आनंदाचे जीवन जगता
नकळत वार्धक्य येई
अंथरुणाला खिळता
कोणी साद न देई ||१||
जीवन सारे असेच गेले
काबाडकष्ट करूनी
न ठेवली कोणी जान
लावले झिडकारूनी ||२||
स्वप्ने होती अनेक उराशी
दडपुन राहिली मनात
वार्धक्याच्या झटक्याने
सारे जीवन गेले अंधारात ||३||
अंथरुण आपले जग
अवघड असे जगणे
हृदयात असे सारे दुःख
तरी चेहऱ्यावर असे हसणे ||४||
खचुन गेले मन माझे
आधार मागे शब्दांचा
परावलंबी असे जीवन
काय अर्थ या जगण्याचा ||५||
प्रत्येक क्षण असे कठीण
वार्धक्यात जगताना
शांत होई देह माझा
हळूवार प्राण सोडताना ||६||