STORYMIRROR

SWATI WAKTE

Inspirational

4  

SWATI WAKTE

Inspirational

वाल्या झाला वाल्मिकी

वाल्या झाला वाल्मिकी

1 min
263

एक होता वाल्या

होता तो दरोडेखोर

लुटायचा वाट्सरुणा

होता तो मोठा चोर

एकदा वाटेतून निघाले नारद

वाल्याला विचारला जाब..

कारे वाल्या करतो हे घोर पाप

कुठे देशील पापाचा हिशोब !


वाल्या म्हणाला एक माझा परिवार

माझे कर्तव्य त्यांचा उदरनिर्वाह

म्हणूनच करतो मी हे सारे

नाही स्वतःसाठी हा मोह

नारद म्हणाले पटते मला तुझे

तुझे कुटुंब तुझी जबाबदारी

सर्वांना विचार तु घरी जाब

घेईल का कुणी तुझ्या पापात भागीदारी ?


वाल्या गेला घरी

 सर्वांना जाब विचारी 

तुमच्यासाठी करतो मी पाप

माझ्या पापात तुम्ही करणार का भागीदारी

कुणीच नाही झाले तयार

करण्या पापाची भागीदारी


वाल्याला झाला पश्चाताप

आपलीच ही चूक सारी

सर्व सोडून गेला वाल्या

करण्या घोर तपश्चर्या अरण्या 

पश्चाताप आणि तपश्चर्या करून 

वाल्याचा बनला वाल्मिकी महान


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational