STORYMIRROR

Sangita Pawar

Inspirational

3  

Sangita Pawar

Inspirational

वाजेल का घंटा शाळेची?

वाजेल का घंटा शाळेची?

1 min
187

कसा कोण जाणे हा

कोरोना कोठुनी आला

साखळी तोडण्यासाठी

सारा देश लोकडॉन केला ||


शाळा बंद झाल्या

ऑनलाइन शाळा सुरू

दुधाची तहान ताकावर

भागवूनी शिक्षण करू ||


डिजिटल फळ्यावर आत्ता

ऑनलाइन शाळा करू

फळा आणि खडू बोलतात

आत्ता तरी शाळा करा सुरू ||


हातातला सुटलाय पेन

सुट्ट्यांचाही वाटतोय ताप

नाही कोणाचाच धाक

झाल्यात परीक्षाही माफ ||


मनात माझ्या सदा येते

शाळेत शिजेल का खिचडी?

लक्षात तरी राहिल का

आपली इयत्ता आणि तुकडी ?||


देवा तू आता कोरोनाला

कायमचाच हाकलून दे

लवकरच आमची शाळा

पुन्हा सुरू होऊन घंटा वाजू दे----||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational